गेल्या वर्षी गणपती उत्सवात आपल्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याची आठवण सांगत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी डीजे बंदीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘नका रे बाबा डीजे लावू’, असं आवाहन त्यांनी केलं.

डीजे बंदीवर बोलताना मेघना बोर्डीकर यांनी स्वतःच्या चुलत भावाच्या दुर्दैवी मृत्यूची आठवण सांगितली. सुप्रीम कोर्टानेही डीजेवर बंदी घातली आहे; मात्र आपल्याला ती मान्य नसते, असं त्यांनी म्हटलं.

सण-उत्सव साजरे करताना आपणही काही मर्यादा घालून घ्यायला हव्यात, असं मत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं.

धाराशिवमध्ये आमदार बसवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी मेघना बोर्डीकर आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *