जळगाव जिल्ह्यातील यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ३९ स्वयंसेवक सहभागी झाले, तर हर्षाली बारी आणि संघशीला भालेराव यांनी यश मिळवले.

यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण ३९ स्वयंसेवकांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. हर्षाली संतोष बारी हिने प्रथम, तर द्वितीय वर्ष कला शाखेतील कु. संघशीला संदीप भालेराव हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड, उपप्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. युवकांनी व्यसनमुक्त आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *