• यावलमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन साजरा
  • फोटोग्राफर असोसिएशनतर्फे विविध उपक्रम
  • आधुनिक फोटो एडिटिंगचे मार्गदर्शन
  • कॅमेरा आणि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
  • फोटोग्राफर बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
  • नितीन कोळी अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्त


JALGAON | यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. आधुनिक फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधींबाबत फोटोग्राफरना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले.

ऋषी जैन यांनी आधुनिक फोटो एडिटिंग टूल्सच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. तसेच बदलते तंत्रज्ञान, आधुनिक कॅमेरा तंत्रज्ञान, फोटो एडिटिंग आणि भविष्यातील संधी याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला ऋषी जैन, विनोद चौधरी, योगेश शर्मा, अनिल पाटील आणि गुणवंत गलवाडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. अभय रावते होते. सूत्रसंचालन कुणाल जोगी यांनी केले. यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष हेमराज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाला फोटोग्राफर बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, नवीन कार्यकारिणीत नितीन कोळी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *