• दिनेश पाटील यांचा विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस
  • विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले
  • पीएम श्री शाळेत वाढदिवसाचा उपक्रम
  • स्वाभिमानी ग्रुपने घेतले विशेष परिश्रम
  • शाळा विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती

GADCHIROLI | यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद पीएम श्री मराठी शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

भाजपाचे कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यासाठी त्यांचा मित्रपरिवार स्वाभिमानी ग्रुपने परिश्रम घेतले

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन, सदस्य कैलास पाटील, समाधान पाटील, अविनाश पाटील, वासुदेव तेली, जितू पाटील, किरण पाटील, गौरव महाजन तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी दिनेश पाटील यांनी शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *