इगतपुरी नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापासून अवघ्या २० मीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कचऱ्यातील घाण पाणी तलावात जात असल्याने जलप्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरपालिकेजवळ कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावालगत डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे घाण पाणी वाहून थेट तलावात जात असल्याने जलप्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. भावली धरणाचे पाणी बंद झाल्यानंतर याच तलावातील पाण्याचा इगतपुरी शहराला पुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड तातडीने अन्यत्र हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *