सेलू तालुक्यातील केळझर येथील अँजेल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

उत्सवाचा एक भाग म्हणून शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, मटकी सजावट स्पर्धा तसेच बासरी सजावट स्पर्धेचा समावेश होता.

या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण, सर्जनशीलता आणि उत्साह सुंदररीत्या सादर केला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने तयार केलेल्या आकर्षक मटक्या आणि सजवलेल्या बासऱ्या उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरल्या.

या सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भारतीय संस्कृतीची ओळख जपली जाते, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. सुंदर सजावट आणि बालगोपाळांच्या आकर्षक वेशभूषेमुळे संपूर्ण शाळा परिसर श्रीकृष्णमय आणि आनंददायी वातावरणात दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *