पैठणी नगरी म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील कारागीर आपल्या कलाकुसरीतून विविध आकर्षक कलाकृती साकारत असतात. याच परंपरेत येथील मुस्लिम युवक कारागीर जावेद अन्सारी यांनी आपल्या कौशल्यातून एक अनोखी पैठणी साकारली आहे. या पैठणी शेल्यावर त्यांनी विणकामाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची सुंदर प्रतिमा साकारली आहे.
श्री स्वामी समर्थांची प्रतिमा पैठणीवर साकारण्यासाठी जावेद अन्सारी यांना तब्बल पाच दिवसांचा कालावधी लागला.
विशेष म्हणजे, एका मुस्लिम कारागिराने श्री स्वामी समर्थांची प्रतिमा पैठणीवर साकारल्याने कलेला धर्माची सीमा नसते, हा संदेश या कलाकृतीतून अधोरेखित झाला आहे.
विविध धर्मांच्या श्रद्धांचा आदर करत जावेद अन्सारी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला आहे.
