अहिल्यानगर जिल्ह्यात गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारू विक्रेत्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. सोनई, नेवासा आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.

१२ आणि १३ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सात आरोपींविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २८ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनई येथील अदनान अश्पाक शेख, नेवासा येथील भगवान अशोक सूर्यवंशी, संकेत राजू गायकवाड, बाळासाहेब सोन्याबापू जाधव, गोविंद उर्फ गोंदया गणपत पिंपळे तसेच कोपरगाव तालुक्यातील शंकर भास्कर भोसले यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. कोपरगाव तालुका गुन्ह्यातील रूपेश संजय तुळसकर हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *