महाराष्ट्राचा गणेशोत्सव आता डिजिटल माध्यमातून कायमस्वरूपी जतन केला जाणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केल्यानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमात मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घराघरातील गणेशोत्सवाचीही नोंद केली जाणार आहे. घरगुती गणपतींच्या परंपरा, सजावट, स्थानिक लोककला, आठवणी तसेच सार्वजनिक मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना डिजिटल संग्रहात स्थान मिळणार आहे. पारंपरिक गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार आणि हस्तकला कारागिरांच्या कलेचीही नोंद केली जाणार आहे.

सहभागासाठी स्वतंत्र ॲप डाऊनलोड करण्याची किंवा क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. घरातील किंवा मंडळातील गणपतीचा चांगल्या दर्जाचा फोटो आणि गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या दोन ते चार ओळी ‘Bappa.org’वर पाठविता येतील.

मिळालेल्या माहितीची तज्ज्ञ समितीकडून पडताळणी होणार असून, त्यानंतर योगदानकर्त्याच्या नावासह अधिकृत नोंद क्रमांक दिला जाणार आहे. नागरिक, गणेश मंडळे, मूर्तिकार आणि हस्तकला कारागिरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *