♦️ धापेवाड्यात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी
♦️ आमदार पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
♦️ नितीन धार्मीक यांच्या शेताला भेट
♦️ पिकांच्या सद्यस्थितीची घेतली सविस्तर माहिती
♦️ पाणी उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांशी साधला संवाद
♦️ उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही
NAGPUR| नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बुद्रुक येथे आमदारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बुद्रुक येथील शेतकरी नितीन धार्मीक यांच्या शेताला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार आणि आमदार आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांना सध्या भेडसावत असलेल्या अडचणी, शेतातील पिकांची परिस्थिती तसेच पाण्याची उपलब्धता याबाबत दोन्ही आमदारांनी माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा पाठपुरावा करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे दोन्ही आमदारांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
मंगेश उराडे |एनटीव्ही न्यूज मराठी | कळमेश्वर, नागपूर
