शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सौरव पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझरीकर यांना निवेदन देण्यात आले. यावर्षी नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, पात्र शेतकऱ्यांना हक्काची पीकविमा नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनात अत्यल्प नुकसानभरपाई मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, पीक पेऱ्याची प्रत्यक्ष लागवड असूनही नोंद होत नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि शेतात प्रत्यक्ष केळीचे पीक उभे असतानाही नोटिसा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची तातडीने पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. कागदपत्रांतील किंवा नोंदींतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना हक्कांपासून वंचित ठेवू नये, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यावेळी सतीश पाटील, मोहन बडगुजर, रामदास बडगुजर, रवींद्र खेवलकर, इमरान खान, सुभाष पाटील, जीवन पाटील, राजू माळी, नूतनराज बडगुजर, मुकुंदा तेली व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *