जळगाव जिल्ह्यातील यावल येथील फैजपूर रस्त्यावरील प्रसिद्ध श्री कुलस्वामिनी मनुदेवी संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या दहा दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या नवरात्रोत्सवात शनिवार दि. ११/१०/२०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता घटस्थापना होणार असून, सकाळी ६:३० वाजता सकाळची आरती आणि संध्याकाळी ७:१5 वाजता संध्याकाळची आरती पार पडेल. तसेच सोमवार दि. १९/२०२६ रोजी अष्टमीच्या दिवशी होम हवन, दररोज सकाळी ११:०० वाजता देवी सप्तपदीचे पाठ, सुखवात आणि नऊ दिवस देवीच्या दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस आराधना केली जाणार आहे. सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मातेचे दर्शन घेऊन नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मनुदेवी संस्थान, यावल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *