नागपुर ज़िल्हयात कमी पावसामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता सावनेर व कळमेश्वर तालुक्यांतील नागरिक व शेतकऱ्यांना भविष्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेत तसेच आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर व कळमेश्वर समित्यांमध्ये पाणीटंचाई निवारणासंदर्भात आढावा बैठका शुक्रवारी पार पडल्या. बैठकीत दोन्ही तालुक्यांतील गावनिहाय पाणीपुरवठ्‌याची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, संभाव्य पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला, पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दयावे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे आशिष देशमुख यांनी नमूद केले. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्‌यासाठी अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता आहे, तेथील कामे तातडीने हाती घेऊन पूर्ण करावीत, अशा सूचना

त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोल्हापुरी बंधारयांची आवश्यक दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता

वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाणीपुरवठ्‌याशी संबंधित अडचणींचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्यात आला. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाण्णाचा मोग्य वापर करण्यासाठी प्रामस्तरावर जनजागृ‌ती मोहीम राबवावी. जलसंधारणाच्या कामांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून पाण्याचे महत्व प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही करण्यात आले.

सावनेर व कळमेश्वर तालुक्यांतील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी संबंधित विचागांनी समन्वयाने काम करावे, उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण, जलसंधारणाची कामे, बंधान्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या. गावेळी आमदार राजीव पोतदार, भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, प्रिया मानकर, देवीदास मदनकर, उपविभागीय अधिकारी कल्याण कुमार डहाट, गटविकास अधिकारी हिरुडकर, मरस्कोल्हे उपस्थित होते.

मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *