जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक उपकेंद्रात आज दिनांक १० रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया तपासणी व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा होता. शिबिरात

  • कानाच्या शस्त्रक्रिया: कानाचा पडदा फाटणे, कानातून पू येणे, ऐकू न येणे
  • नाकाच्या शस्त्रक्रिया: नाकाच्या हाडाचा त्रास, नाकात मांस वाढणे, सायनस
  • घशाच्या शस्त्रक्रिया: घशात गाठी, टॉन्सिल, आवाज बदलणे, गिळताना त्रास होणे
  • सामुदायिक आरोग्य: रक्तदाब, मधुमेह व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा पात्र रुग्णांच्या आयुष्मान भारत कार्डद्वारे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया जळगाव येथील रुग्णालयात करण्यात येणार आहेत.

ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा पात्र रुग्णांच्या आयुष्मान भारत कार्डद्वारे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया जळगाव येथील रुग्णालयात करण्यात येणार आहेत. या शिबिरात डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागाचे डॉक्टर विकास पवार आणि होमिओपॅथिक डॉक्टर सानिका राय यांनी तपासणी केली, तर गोदावरी हॉस्पिटलचे सहनर्लिंग स्टाफ व स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री गणेश आरोग्य सेवा व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. दरम्यान, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सावखेडा सीम येथे, १५ ऑक्टोबर रोजी डोंगर कठोरा येथे, २४ ऑक्टोबर रोजी कासारखेडा येथे आणि २९ ऑक्टोबर रोजी शिरसाड साखळी येथे अशाच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *