जळगाव जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये, अशी एकूण चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि रामेश्वर नाईक यांच्या सहकार्यामुळे या रुग्णांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जळगाव जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या पाठपुराव्यासह मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सहकार्यामुळे ही मदत उपलब्ध झाली आहे.
यामध्ये दिव्यांशू तायडे यांना अस्थिमज्जा प्रत्यारोपण अर्थात बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या उपचारांसाठी दोन लाख रुपये, तर गुलाब ठाकरे यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण अर्थात किडनी ट्रान्सप्लांटच्या उपचारांसाठी दोन लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
या दोन्ही उपचारांचा खर्च मोठा असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या रुग्णांना या मदतीचा लाभ होणार आहे. गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार अमोल जावळे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. रामेश्वर नाईक यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून ही मदत मंजूर झाली.
या मदतीबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल जावळे आणि रामेश्वर नाईक यांचे आभार व्यक्त केले. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी महत्त्वाची भूमिका बजावत असून, वेळेत मदत मिळाल्याने गरजू रुग्णांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे.
