♦️ गिरणा नदीतील अवैध रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर
♦️ जप्त डंपर आणि ट्रॅक्टर दंडाविना सोडल्याचा आरोप
♦️ गौण खनिज दंड न भरल्याचा तक्रारीत उल्लेख
♦️ पोलिसांच्या पंचनाम्यांवरही उपस्थित केले प्रश्न
♦️ न्यायालयीन आदेश आणि निर्णयांत तफावत असल्याचा दावा
♦️ विजय दोधा पाटील यांची चौकशीची मागणी
भडगाव येथील गिरणा नदीतील अवैध रेती तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले डंपर आणि ट्रॅक्टर गौण खनिजाचा दंड न भरता सोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या पंचनाम्यांसह न्यायालयीन आदेश आणि निर्णयांमध्ये तफावत असल्याचा दावा करत विजय दोधा पाटील यांनी चौकशी आणि ऑडिटची मागणी केली आहे.
JALGAON | भडगाव येथील गिरणा नदीतील अवैध रेती तस्करी प्रकरणात पकडण्यात आलेली आणि फौजदारी गुन्हे दाखल असलेली डंपर व ट्रॅक्टर ही वाहने गौण खनिजाचा दंड न भरता तसेच दंड भरल्याची पावती सादर न करता सोडली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरीची मालमत्ता जप्त असतानाही संबंधित वाहने कोणताही दंड न भरता सोडण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या वादग्रस्त प्रकरणात पोलीस तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पंचनामे बोगस किंवा खोटे असल्याचा आरोप करण्यात आला असून, तत्कालीन न्यायाधीश आणि विद्यमान न्यायाधीश यांच्या आदेश व न्यायनिर्णयांमध्ये तफावत आढळल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात अवैध रेती तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत विजय दोधा पाटील यांनी संबंधित न्यायनिर्णय आणि आदेशांमधील तफावतीची चौकशी करून ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे तसेच मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | भडगाव
