♦️ यावल तालुक्यात २८१ दुर्गोत्सव मंडळांकडून देवीची स्थापना

♦️ ५७ गावांमध्ये नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा

♦️ २१ ऑक्टोबरपासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

♦️ २२ ऑक्टोबरला यावल शहरासह १७ गावांत मिरवणुका

♦️ २३ ऑक्टोबरला सर्वाधिक २२ गावांमध्ये विसर्जन

♦️ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात नवरात्र उत्सवाची सांगता आता दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकांनी होणार आहे. तालुक्यातील ५७ गावांमध्ये २८१ दुर्गोत्सव मंडळांनी देवीची स्थापना करून नऊ दिवस भक्तिभावाने पूजाअर्चा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला आहे. आता २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान विविध गावांमध्ये विसर्जन मिरवणुका निघणार असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यावल तालुक्यात २१ ऑक्टोबर रोजी पाच गावांमध्ये दुर्गा मातेची भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. तर गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी यावल शहरासह १७ गावांमध्ये विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.
२३ ऑक्टोबर रोजी २२ गावांमध्ये, तर २४ ऑक्टोबर रोजी सहा गावांमध्ये दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत.
या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे आणि त्यांचे सहकारी विविध गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार आहेत.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *