♦️ योगेश अडकमोल यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

♦️ नागपूर अधिवेशनात पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

♦️ संघटन कौशल्य आणि कार्याची दखल

♦️ शासकीय कर्तव्य बजावत संघटनेसाठी भरीव योगदान

♦️ कृष्णा इंगळे आणि नितीन राऊत यांच्या हस्ते सन्मान

♦️ पदाधिकारी आणि सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

JALGAON | जळगाव कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे तत्कालीन कार्याध्यक्ष योगेश अडकमोल यांना त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कार्याबद्दल २०२५ या वर्षासाठी राज्यस्तरीय ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

योगेश अडकमोल यांचे संघटन कौशल्य आणि संघटना वाढीसाठी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी भरीव योगदान दिले.
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे तसेच राज्याचे माजी मंत्री आणि आमदार नितीनजी राऊत यांच्या हस्ते योगेश अडकमोल यांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राज्य पदाधिकारी गणेश मडावी, सुमित भुईगळ, सुरेश तांबे, प्रभाकर सोनडवले आदी उपस्थित होते.
योगेश अडकमोल यांच्या या सन्मानाबद्दल कास्ट्राईब नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, जिल्हाध्यक्ष पुलकेश केदार, प्रा. प्रमोद लोंढे, नंदू गायकवाड, राकेश निकुंभे, रोहित पावरा, विकास सोनवणे, योगीराज तेली, एच. डी. बनगे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विज्ञान सैदाने, पाटबंधारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, विलास डोंगरे, महेश सपकाळे, रुपेश ठाकूर, सिद्धांत बडगे, भास्कर घुले, जीभाऊ हटकर, सुरेश भालेराव, साधना बाविस्कर मॅडम, किशोर महिराळे, रवींद्र गायकवाड, सुरेश वाडे, मंदा मोरे आणि सोनाली बारेला आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

एनटीव्ही न्यूज मराठी | जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *