शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही एरंडोलच्या गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर, दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर, तर पलक सिद्धेश महाजन हिची थेट राज्यस्तरावर निवड झाली आहे.

एरंडोल येथील गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेच्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर, दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर, तर एका गुणवंत विद्यार्थिनीची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धांसोबतच बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ या खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. मैदानी स्पर्धांमध्ये ६०० मीटर, ८० मीटर हर्डल्स, ११० मीटर हर्डल्स, ४०० मीटर, ४०० मीटर हर्डल्स, उंच उडी, भालाफेक, हातोडाफेक आणि ५ किलोमीटर चालणे अशा विविध प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले.

विशेष उल्लेखनीय कामगिरी करत ईशान मच्छिंद्र महाजन याने कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत विभागीय स्तरावर स्थान मिळवले. तर पलक सिद्धेश महाजन हिने बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी करत थेट राज्यस्तरावर निवड होण्याचा बहुमान मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि क्रीडा शिक्षक रोहित सपकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, मुख्याध्यापिका भालेराव मॅडम, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पालकांनी यशस्वी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *