जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नायब तहसीलदार अमोल बन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एरंडोल विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे १०० टक्के काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) अमोल बन यांचा गौरव करण्यात आला.

विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अमोल बन यांनी दाखवलेली तत्परता आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे निर्धारित उद्दिष्ट वेळेत साध्य झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अमोल बन यांनी हे यश सामूहिक कामगिरीचे फलित असल्याचे नमूद केले. उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व १८ बीएलओ कर्मचाऱ्यांची निष्ठा व तत्परता यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमोल बन यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *