आमदार राहुलदादा कुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. आपल्या एक वर्षाच्या संपूर्ण मानधनाचा धनादेश त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे सुपूर्द केला.

महाराष्ट्रावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडचे आमदार ॲड. राहुलदादा कुल यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.

शेतकऱ्यांच्या संकटात आपलेही योगदान असावे, या भावनेतून सभापती चोरमले यांनी आपले एक वर्षाचे संपूर्ण मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आज आमदार राहुलदादा कुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सभापती सुखदेव चोरमले यांनी आपल्या एक वर्षाच्या मानधनाचा धनादेश आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी बोलताना सभापती चोरमले म्हणाले, “संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी आपले योगदान देणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. माझ्या या छोट्याशा योगदानातून दुष्काळग्रस्त बांधवांना थोडा दिलासा मिळावा, हीच मनापासून भावना आहे.”

सभापतींच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या दिवशी सत्कार आणि पुष्पगुच्छ यापेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा राहुलदादा कुल यांचा आदर्श कार्यकर्त्यांनी जपल्याची चर्चा दौंड तालुक्यात रंगली आहे.

सुशांत जगताप | एनटीव्ही न्यूज मराठी | दौंड, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *