बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील २७ वर्षीय तरुणाचा विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सैनिकी शाळेसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाचे नाव माधव गंगाधर चावरे (वय २७, रा. सगरोळी) असे आहे. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता तो विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लाईनमन शिवाजी मामीलवाड यांच्या सांगण्यावरून माधव चावरे विद्युत खांबावर काम करण्यासाठी चढला होता. मात्र, काम सुरू असतानाच ऑपरेटर किंवा अन्य कर्मचाऱ्यांकडून वीजप्रवाह सुरू करण्यात आल्याने माधवला जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेने माधवच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सगरोळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दादाराव इंगळे | एनटीव्ही न्यूज मराठी | बिलोली, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *