दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल एसटी आगाराने प्रवाशांसाठी नवीन बससेवा सुरू केल्या आहेत. पुणे, कल्याण, सुरतसह ग्रामीण भागातील प्रमुख मार्गांवरही विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त बाहेरगावी राहणारे नागरिक मोठ्या संख्येने गावी येत असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एरंडोल एसटी आगाराने नवीन आणि विस्तारित बससेवा सुरू केल्या आहेत.

कल्याण-विठ्ठलवाडी आणि सुरतसाठी नवीन बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर ३ नोव्हेंबर २०२६ पासून पुण्यासाठी रातराणी बससेवा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी दररोज सकाळी ६.३० आणि दुपारी १२.३० वाजता बस सुटणार आहे. तसेच ४ नोव्हेंबरपासून शिरपूरसाठीही याच वेळेत दररोज दोन बसफेऱ्या सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पारोळा, चोरवड आणि भडगावमार्गे पाचोरा या मार्गावरही नवीन बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीत प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले असून नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी नवीन एसटी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एरंडोल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *