यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे. वाणी गल्लीतील गटार बांधकामासाठी तब्बल १९ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, नगरसेवक पराग सराफ यांनी आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले आहेत.
यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेवक पराग विजय सराफ यांनी पाठपुरावा केला.
वाणी गल्लीतील सुनील श्रावगी यांच्या घरापासून बाविसे सर यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधण्यासाठी १९ लाख ९० हजार ९५० रुपयांच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या नगरविकास शाखेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामासाठी आमदार अमोल हरीभाऊ जावळे आणि माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी विशेष सहकार्य केल्याचे सांगत नगरसेवक पराग सराफ यांनी त्यांचे आभार मानले.
