अकोला जिल्ह्यातील कळंबा बुद्रुक ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदान दिन साजरा करण्यात आला असून, यापुढे दर मंगळवारी श्रमदान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कळंबा बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर आणि छत्रपती शिवस्मारकाच्या प्रांगणात श्रमदान करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कापसे, सरपंच गोपालराव उगले, पंचायत समिती बाळापूरचे गटविकास अधिकारी दीपक सावडे, विस्तार अधिकारी पुरुषोत्तम नकट, संदीप आगळे, गंगाधर गुंडेकर, दिग्विजय चव्हाण आणि ग्रामपंचायत अधिकारी शशांक धुळे उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यापुढे दर मंगळवारी ग्रामपंचायत परिसरात श्रमदान राबविण्यात येईल, अशी माहिती सरपंच गोपालराव उगले यांनी दिली.

कळंबा बुद्रुक, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *