आष्टी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारीपदी प्रशांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली असून, पत्रकार आणि प्राध्यापकांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
आष्टी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारीपदाचा कार्यभार प्रशांत शिंदे यांनी बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वीकारला. ते सध्या शिरूर कासार येथे गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी २००३ ते २०१५ या काळात आष्टी येथे विस्तार अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे तालुक्यातील शैक्षणिक परिस्थिती, शिक्षकांचे प्रश्न आणि शाळांच्या प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे.
मितभाषी, कार्यकुशल आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित असलेल्या प्रशांत शिंदे यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शैक्षणिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार तथा प्रा. निसार शेख, आजीमोदीन बागवान, प्रा. ज्ञानदेव गाडे, प्रा. विवेक महाजन, प्रा. आझरोदिन शेख, प्रा. सचिन वाळके आणि प्रा. लोखंडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांचे प्रश्न सोडविणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रभावी काम करण्याच्या अपेक्षांसह प्रशांत शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
आष्टी, बीड
#Ashti #Beed #EducationDepartment #GroupEducationOfficer #PrashantShinde #EducationNews #MaharashtraNews #NTVNewsMarathi #आष्टी #बीड #शिक्षणविभाग #प्रशांतशिंदे #शैक्षणिकबातम्या
