समान नागरी संहिता म्हणजेच UCC विधेयकाच्या पार्श्वभूमीवर उमरखेडमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत विधेयकाच्या तरतुदी आणि परिणामांवर चर्चा होणार असून, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कासिम रसूल इलियासी आपले विचार मांडणार आहेत.
सरकारकडून समान नागरी संहिता विधेयक लागू करण्याची प्रक्रिया सुरू असताना, काही राज्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामिक युथ फेडरेशनच्या वतीने उमरखेड येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी ए-१ फंक्शन हॉलमध्ये ही सभा होणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कासिम रसूल इलियासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून समान नागरी संहितेवर आपले विचार मांडणार आहेत.
UCC विधेयकाच्या निकष, तरतुदी आणि संभाव्य परिणामांवर या सभेत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताहेर मिर्झा | एनटीव्ही न्यूज मराठी | उमरखेड
