विकास कामांमध्ये टीका टिप्पणीला न घाबरता मतदारांशी असलेली आपुलकी, कर्तव्य, मतदारांना दिलेला शब्द आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी याचे भान ठेवून सातत्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांनी सत्तेचा स्वार्थासाठी उपयोग नाही तर जनतेच्या विकास कामासाठी आणि साध्य म्हणून उपयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने त्यांनी जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासाला चालना दिली. माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास कार्याला गती दिली. याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार, बांधकाम मंत्री राजे शिवेंद्र सिंग भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत यांची साथ मिळाली. या दृष्टीने त्यांनी कामाला गती दिली आहे. आज त्यांनी न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून काम प्रगतीपथावर असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जनतेसाठी उड्डाणपूल उपलब्ध करून देण्याच्या शब्दाला गती देण्याच्या दृष्टीने त्यांनी आज कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यासोबत लोकप्रतिनिधी यांना घेऊन त्यांनी रेल्वे विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उड्डाणपूल जोडण्यासाठी पाच गाळ्यांचे काम सुरू आहे असून दोन गाळे रेल्वे विभाग करत असून घड्याळ टाकण्याचे काम आणि वेल्डिंगचे काम सुरू आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुद्धा तीन गाळ्यांचे काम सुरू आहे, त्याची पाहणी केली. यावेळी महापौर शारदाताई खेडकर तसेच विजय अग्रवाल, जयंत मसने, एडवोकेट देवाशिष काकड, रणजीत खेडकर, पवन महाले, बाळू जगताप, उमेश श्रीवास्तव, सिद्धार्थ पर्वत, सागर शेगोकार, बाळू सोनवणे, नितीन ताकवले, शशिकला काळे, हरीश काळे, करण शाहू, संदीप गावंडे, प्रशांत जोशी, कुमारी नीतू जगताप, विद्याधर काकड, तुषार भिरड, गणेश अंधारे, माधव मानकर, प्रशांत अवचार, देवानंद टाले, जितेंद्र देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार सावरकर यांनी रेल्वे अधिकारी रायबोले, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशन विभागाचे इंजिनियर गावंडे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता राजेश राठोड यांना सूचना दिल्या. यावेळी कॉन्ट्रॅक्टरला, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम यांना सुद्धा कामाला गती देण्याचे निर्देश दिले.
अमोल जामोदे | एनटीव्ही न्यूज मराठी | अकोला
