उस्मानाबाद : जिल्ह्यातील अनेक तालुके आजही प्रधानमंत्री पीक विमा पासून वंचीत आहेत, उमरगा तालुक्यातील अनेक गावे २०१९-२० मध्ये पीक विम्यातून वगळण्यात आले होते, त्यानंतर २०२०- २१ चा ही पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेच नाही त्यामुळे शेतकरी हताश होऊन सरकारी दफतरी फेऱ्या मारत आहेत. गेले दोन वर्षांपासून शेतकरी अतिवृष्टी चा सामना करत आहेत, पिका विमा अर्ज भरूनही प्रशासन व संबधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची कुचेष्टा लावली आहे.

याबाबत मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते रामलिंग पुराणे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विमा पासून वंचीत शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावे असे विनंती निवेदन केले आहे.
गेले दोन वर्षांपासून उमरगा तालुक्यातील शेकडो शेतकरी पीक विमा पासून वंचीत आहेत, २०१९-२० मध्ये तालुक्यातील अनेक गावे मुरूम,केसर,जवळगा,आलूर,बेळंब,कोथळी,कंटेकूर, मुरळी सह अनेक गावे पीक विम्यातून वगळण्यात आले, २०२०-२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले, सरकारी कर्मचारी व संबधित विमा कंपनी प्रतिनिधीनि नाममात्र शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आणि सरसकट मदत जाहीर करण्यात आली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज केला नव्हता,अद्याप ज्यांनी अर्ज केला आहे आणि ज्यांनी केला नाही या दोन्ही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाली नाही, उस्मानाबाद जिल्ह्यातील विशेष करून उमरगा तालुक्यातील गावातील पीक विमा पासून वंचीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा जो पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा होणार नाही तो पर्यंत शेतात बसून अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी आपल्या दि.१३ जानेवारीच्या निवेदनातून दिले आहे.
———————-//——————
“ग्रामीण भागातील शेतकरी बांधवात निरक्षर शेतकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे, आणि त्याचाच फायदा हे विमा कंपनी घेत आहेत,विमा अर्ज भरण्या पासून ते विमा भेटे पर्यंत शेतकरी बांधवाना तलाठी कार्यलय,महा ई सेवा केंद्र,बँकेत तसेच संबधित कार्यलयात रांगा लावून बसावं लागत, मुळात करोडो रुपये कमवणाऱ्या या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे स्वतः जाऊन पीक विमा अर्ज भरायला पाहिजे, पण तसे होत नाही, उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विमा पासून वंचीत शेतकरी बांधवाना जर वेळेत विमा रक्कम देऊन न्याय दिले तर ठीक अन्यथा मी स्वतः पंधरा दिवसां नंतर शेतामध्ये बसून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करेन. जो पर्यंत शेतकरी बांधवाच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.”– रामलिंग पुराणे,समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
प्रतिनिधी सचिन बिद्री-उस्मानाबाद