उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नवोपक्रम स्पर्धेत उमरगा तालुक्यातील दोन शिक्षकांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय साठी निवड झाली आहे. माध्यमिक गटातून उमर्ग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सादर केलेला “मियावकी जंगल निर्मिती एक ऑक्सिजन हब” या नवोपक्रमाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव चे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांच्या “शिक्षणाचा लाऊडस्पीकर” या उपक्रमाला प्राथमिक गटातून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाला. दोन्ही उपक्रमाची निवड राज्यस्तरीय वर झाली आहे .या निवडीबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्तार अधिकारी महाबोले साहेब ,सुरवसे एस आर केंद्रप्रमुख शिला मुदगडे प्रकाश मुळे, कोरेगावचे सरपंच संजय पाटील सुभाष चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे , उपाध्यक्ष शंकर सुरवसे सारिका वाघमोडे, उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वजित कटके माजी अध्यक्ष मनोहर बंडगर उपाध्यक्ष अविनाश कांबळे व तालुक्यातील विविध स्तरावरून दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

सचिन बिद्री-उमरगा उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *