फैजपूर येथे आयोजित बाल कला महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडे सिमच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे.

यावल तालुक्यातील सावखेडे सिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी फैजपूर येथे आयोजित बाल कला महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत अतिशय सुंदर आणि बहारदार नृत्य सादर केले.

या स्पर्धेत सहभागी शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या शाळेचा एकमेव सहभाग होता. जवळपास ७० ग्रुप डान्समधून सावखेडे सिम शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *