यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील पोलीस पाटील जुबेर शहा खलील शहा यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरात पोलीस पाटील म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जळगाव येथे पोलीस पाटील मेळावा आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जुबेर शहा यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित उपस्थित होते.
उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान झाल्यानंतर जुबेर शहा यांचे यावल तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.
