4 गावठी कट्टे (पिस्टल) व 3 जिवंत काडतुसे (राउंड) जप्त

उस्मानाबाद : दि.30.12.2021 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांचे आदेशाने आरोपी नामे राजेंद्र सुरेश कांबळे,व एक विधिसंघर्ष बालक यांचेकडे अवैध शस्त्र असले बाबत गोपनिय माहीतीच्या आधारे कारवाई करण्यात आली असुन आरोपी नामे राजेंद्र सुरेश कांबळे यांचेकडे एक गावठी कट्टा (पिस्टल) मिळुन आले

त्यावरुन पोलीस स्टेशन तुळजापुर गुरनं. 465/2021 कलम 25 (3) शस्त्र अधिनियम सह कलम 188, 34, भादवीसह कलम 37 (1) (c), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्हयाचे तपासात एकुण 5 आरोपी नामे 1. सचिन खंडु जाधव, वय 29 वर्ष, व्यवसाय हाँटेल चालक, रा. मटन मार्केट, तुळजापुर, 2.शैलेश श्रीकांत नरवडे, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, रा.जिजामाता कन्या शाळा, तुळजापुर, 3. मयुर बापु बनसोडे, वय 26 वर्ष, व्यवसाय व्यापार, रा.भिम नगर, उस्मानाबाद,4. विश्वजीत विजय आमृतराव, वय 25 वर्ष, व्यवसाय पुजारी, रा. खडकाळ गल्ली,तुळजापुर, 5. सौरभ दत्तात्रय टोले, वय 22 वर्ष, व्यवसाय पुजारी, रा.घाटशिल रोड पार्कीग, तुळजापुर सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील असून यांना अटक करुन आरोपीतांकडुन एकुण 4 गावठी कट्टे (पिस्टल) व 3 जिवंत काडतुसे (राउंड) जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निवा जैन,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापुर डाँ.सई भोरे – पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, सपोनि. सुशील चव्हाण, सपोनि. ज्ञानेश्वर कांबळे,पोउपनि राहुल रोटे, पोउपनि. चनशेट्टी, पोहेअ.अजय सोनवणे, अतुल यादव, पोना.गणेश माळी, मपोना. लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पंतगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांनी केली आहे.

प्रतिनिधी आयुब शेख सह सचिन बिद्री,उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *