हिंगोली : शासनाकडून गोरगरीब कुटुंबातील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानात कुटुंबातील प्रत्येक एका नागरीकास प्रत्येक महिन्याला तिन किलो गहु दोन किलो तांदूळ स्वस्त दरात दिले जात असुन कोरोना महामारी काळात कुठे संचारबंदी तर कुठे लाॅकडाऊन यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब नागरीकासाठी केंद्र सरकार कडुन तितकेच धान्य मोफत दिले जात असुन सेनगाव तालुक्यात कार्डधारकांना स्वस्त दरात मिळालेले राशनचे धान्य कमी दरात खरेदी करून काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई होत नसल्याने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यात राशनचे धान्य खरेदी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याने राशनचा काळा बाजार सुरू आहे

हिंगोली जिल्ह्यात विराट राष्ट्रीय लोकमच काॅन्सिने राशनचा महा घोटाळा समोर आणला तरी कारवाई मात्र शुन्य असल्याने पुन्हा सेनगाव तालुक्यात राशनचा काळाबाजार सुरू आहे.अशीच एक घटना नुकतीच सुकळी येथे घडली असुन सुकळी येथील नागरीकांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्यं पिकअपमधुन काळ्याबाजारात जात असतांना पोलीसांना पकडुन दिले आहे.तर दुसरीकडे सेनगाव तालुक्यात ठराविक काही जण राशनचे धान्य घेण्याचा व्यावसाय करीत असुन राशन माफीया गावागावात जाऊन भरदिवसा नागरीकांकडुन राशनचे गहु बारा ते तेरा रुपये तर तांदुळ दहा रुपये प्रती किलो प्रमाणे खरेदी करत असुन मराठवाड्यातील स्वस्त धान्य थेट रिसोड, वाशिम विदर्भात काळ्याबाजारात विक्री केली जात आहे स्वस्त धान्य खरेदी करण्यासाठी ज्या त्या संबंधित पोलिस ठाणे हद्दीत पोलीसांना चिरीमिरी देऊन हा व्यावसाय खुलेआम सुरू असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य नागरीकांतुन होत आहे.

शासनाकडुन गोरगरीब कुटुंबातील कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात दिले जाणारे राशनचे धान्य कार्डधारकांनी विक्री तसेच कोनत्याही व्याक्तीने खरेदी करने हा गुन्हा असलातरी राशन चे धान्य खरेदी करुन काळाबाजार सुरू आहे याकडे संबंधित पुरवठा विभागाने साफ दुर्लक्ष केले असून सेनगाव तालुक्यात राशनचा काळा बाजार सुरू असुन मराठवाड्यातील स्वस्त धान्य भर दिवसा चारचाकी,तिनचाकी आॅटोतुन थेट विदर्भात काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे.गहु, तांदुळ या धान्यास बाहेरराज्यात मागणी असल्याने जास्तं दरात विक्री होत असुन राशनचे धान्य खरेदीसाठी अनेक मोठे व्यापारी हा व्यावसाय करीत आहे.गावागावातुन खरेदी करून रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्रीस जात असुन याकडे पुरवठा विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतुन केली जात आहे.