हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकाकडून गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यात येत असून केंन्द्रा बु.येथे सार्वजनिक ठिकाणी शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल,गोवा कंपनिचा गुटखा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असतांना देखील एका आरोपीने अवैध गुटख्याची विक्री करतांना पोलीसांनी पकडले

पोलीस गोविंद खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वैभव दिलीपराव पवार वय 22 वर्ष यास आटक केले असुन त्यांच्याकडुन विमल,गोवा कंपनिचा गुटख्यासह,एक दुचाकी MH 38 एल 9981क्रमांकाची मोटरसायकल असा एकुण 38 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केली असुन पुढील तपास डाखोरे हे करीत आहे

गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी सागीतले आहे

विशेष म्हणजे महाराष्ट्रात गुटखाबंदी, विक्री बंद असतांना देखील बाहेर राज्यतुन सरास गुटखा विक्रीसाठी येत असुन यांमध्ये दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होत असुन गुटखा विक्री व्यावसायामध्ये मोठी कमाई होत असल्याने अनेकजण हा व्यावसाय करीत आहे. वरीष्ठाणी यांकडे लक्ष देत गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *