हिंगोली जिल्ह्यातील आडोळ येथे अल्पभूधारक शेतकरी समाधान पांडूजी खिल्लारे यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. यावर्षीची नापिकी, सावकारी आणि बँकेच्या कर्जामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.
समाधान पांडूजी खिल्लारे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. यावर्षी झालेली नापिकी, सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी, तसेच मुलींच्या लग्नाची जबाबदारी कशी पार पाडावी, या चिंतेत ते होते. आज शेतात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी आणण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत असून, घटनेमुळे आडोळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.
महादेव हारण | एनटीव्ही न्यूज मराठी | सेनगाव, हिंगोली
