हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचे गेल्या चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. मात्र, महामार्ग रद्द न झाल्याने आज मोठ्या संख्येने शेतकरी हिंगोली शहरात दाखल झाले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नांदेड नाका परिसरातच रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे.
