सचिन बिद्री:उमरगा
तालुक्यातील त्रिकोळी शिवारात दि १८ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रित्या गावठी दारू तयार करणाऱ्या छुप्या अड्ड्यावर अचानक धाडी टाकून अड्डे उध्वस्त करण्यात पोलीसांना यश आले असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि भुजबळ,पोलीस नाईक मारेकर,गरड,पोलीस शिपाई बोईनवाड आदी खाजगी वाहनाने उमरगा हददीत अवैध्द धंदयाची माहिती काढत असताना त्रिकोळी शिवारात एक ईसम त्याच्या शेताच्या बांधावर उघडयावर लिंबाचे झाडाजवळ गा.ह.भ. दारुचा बेकायदेशीररित्या चोरटा विक्री व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर पोलीस पथकाने अचानकपणे १६.३० वाजता छापा मारला.

ज्यामध्ये एकूण अंदाजित रु १,१४,५००/- चा मुद्देमाल ,यामधील दारु व गुळमिश्रीत रसायण जागीच नष्ट करून,घटनास्थळ पंचनामा पोहेकॉ सुर्यवंशी यांनी केला.संबंधित फरार आरोपींविरुद्ध बेकायदेशीर रित्या अवैध चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे तसेच तयार करण्याचे उददेशाने बाळगलेला ईसमा विरुद्ध पोलीस नाईक शरदचंद्र शिवाजी मारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६५(ई),६५(फ) म.प्रो.का.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.