उस्मानाबाद : कोरोना काळामध्ये कोविड यौद्धा म्हणून ज्याने प्रामाणिक काम केले, 48 रुग्णांना बरे करून घरी पाठवले, येडशी गावातील विविध क्षेत्रातील लोकांनी दिलेली मदत, वर्गणी तिचा खर्च कोराना रुग्णांना करून चांगला प्रामाणिकपणा दाखवला, जनता कोविड सेंटर सफल करून दाखवले तसेच स्वतःच्या आईला देखील त्याच सेंटरमध्ये दाखल करून उपचार घेतला नंतर जास्त त्रास वाढल्याने बार्शी येथे उपचार केला पण कोरोनो रिपोर्ट निगेटिव्ह झाल्यानंतर पोस्ट कोविड उपचारा दरम्यान उस्मानाबाद येथे त्यांच्या आईचे दुर्दैवाने निधन झाले तरी पण त्यांनी सामाजिक बांधिलकी न सोडता सामाजिक कार्य सुरूच ठेवलं आशा या रियल कोरोना योध्याला मानाचा सलाम तसेच कडक उन्हाळ्यात दीड महिना दिवस रात्र गावाला पाणी पुरवले, कोरोना काळात गरजू लोकांना अन्न धान्य पुरवले, कोरोना काळात रुग्णांना दवाखान्यात जाणे येणे करीता वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली, यामुळे कोविड योद्धा, जलदूत, मित्र मा. गजानन भैय्या नलावडे यांचा सत्कार एसएससी 1998 बॅच च्या वतीने जनता विद्यालय येथे करण्यात आला…

यावेळी लक्षिमन माने साहेब पोलीस, सचिन शिंदे सर, नागजी शिंदे,पवन पवार सर, नितीन सोलवट सर, जगदीश जागते सर, गाढवे सर मुख्याध्यापक, नितीन जेवे सर, विठ्ठल शिंदे,महादेव नलवडे, उल्हास कंकाळ घावटे तसेच सरपंच गोपाळ नागटिळक राहुल पताळे उपसरपंच मुख्याध्यापक गाडवे सर ग्रामस्थ विद्यार्थी हजर होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189