( सचिन बिद्री:उमरगा) :

उमरगा-लोहारा तालुका कार्यक्षेत्र असलेली व राज्यस्तरीय आदर्श सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीने अल्पावधीतच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. या संस्थेस गेल्या आर्थिक वर्षात एकूण 59 लाख रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन पद्माकर मोरे यांनी दिली. तीस वर्षापूर्वी संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.गोविंदराव साळुंके यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आज नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. स्थापनेपासूनच “अर्ज द्या कर्ज घ्या”. या घोषवाक्याचे प्रत्यक्षात अंमलबजावणी करत सोसायटीच्या संचालक मंडळाने अतिशय काटकसरीने व नियोजनबद्ध कारभार केलेला आहे. सभासदांच्या हिताच्या अनेक योजना राबवून नियमित कर्ज वसुलीने संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवलेला आहे. पतसंस्थेचे 491 सभासद असून भाग भांडवल 2 कोटी 77 लाख आहे. सभासदांच्या बचत ठेवी 1 कोटी 79 लाख , सभासद ठेवी 1कोटी 49 लाख, मुदत ठेवी 2 कोटी 97 लाख ,आवर्त ठेव 50 लाख 64 हजार , विशेष ठेवी 24 लाख 35 हजार, सभासद कर्ज संरक्षण ठेव 50 लाख 11हजार ,गंगाजळी 58 लाख 75 हजार, संस्था मुदत ठेवी 1 कोटी 11 लाख असून संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 21 कोटी 56 लाखाची उलाढाल केली असून एक कोटी पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे सर्व तरतुदी, खर्च वजा जाता निव्वळ नफा 59 लाख रुपये झाला आहे. संस्था कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता सभासदांना 11 टक्के व्याजाने कर्ज देते. काटकसर व पारदर्शी व्यवहाराने संस्थेत सतत ऑडिट वर्ग “अ” आहे. सभासदांच्या हितासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार ,आवर्त ठेव योजना, सेवा निवृत्त सभासदांचा सन्मान, कन्यादान योजना, सभासदांचा मृत्यू झाल्यास संपूर्ण संपूर्ण कर्जमाफ,अशा वेगवेगळ्या योजना संस्था राबवत आहे,संस्थेने स्वतःच्या मालकीची नवीन आरोग्य नगर उमरगा येथे जागा घेतली असून इमारतीचे भूमिपूजन झालेले आहे. लवकरच भव्य वास्तू निर्माण होईल अशी अपेक्षा चेअरमन पद्माकर मोरे यांनी व्यक्त केली. संस्थेच्या संचालक मंडळाने अतिशय काटकसरीने व जिद्दीने वसुली करून संस्थेचा एनपीए अतिशय कमी ठेवलेला आहे भविष्यातही सभासदांसाठी आणि चांगले निर्णय घेण्याचा मानस संस्थेच्या संचालक मंडळाने बोलून दाखवलेला आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, संस्थेचे माजी चेअरमन हनुमंत शिंदे, दयानंद पाटील, दिनकर कुलकर्णी,संचालक बशीर शेख ,श्रीमंत जाधव, महेश कांबळे, मीना सोनकांबळे,धनश्री दळवी, सचिव तुकाराम कुंभार राम साळुंके,कम्प्युटर ऑपरेटर नवाज शेख, यांच्या प्रयत्नाने संस्थेने राज्यात मोठा नावलौकिक मिळवलेला आहे.