भूमिपुत्र वाघ यांचे देशातील परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांना आवाहन.
मित्रांनो अनिष्ट रूढी आणि परंपरा ह्या आपण मान खाली घालून, अभ्यास न करता वैज्ञानिक चाचणी न घेता, वैज्ञानिक विचार न करता, परिवर्तनवादी विचार न करता, न स्वीकारता ,सरळ चालत राहतो.

जरा विचार करायला हवा की आपल्या पूर्वजांच्या किंवा सध्या आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात लोक मयत होतात. त्याची हस्ती आणि रक्षा आपण जवळच्या देवस्थानच्या बाजूला वाहणाऱ्या नदीत सोडून देतो. खूप वेळा पाणी कमी असतं किंवा संपलेला असतं. तरी आपण नदीमध्ये विसर्जित करतो. डोक्याची केस रक्षा हाडे यामुळे पाणी दूषित होतं. आणि ते खराब होतं. प्राणी पक्ष्यांना ते पाणी प्यायचं असतं यांना रोगराई होऊन प्राणी पक्षी मारतात. जर असं होत असेल तर आपण पुण्याचं काम करतो ती पाप करतो याचा विचार करा.
“रक्षा पाण्यात विसर्जन करतो म्हणजे पूर्वजांचा इतिहास पुसून टाकतो” असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. वरती दान दक्षिणा देऊन पुजाऱ्यांची पोट भरतो. म्हणजे प्रत्यक्षात विचार केला तर त्यांचा इतिहास आपण पुसून टाकतो. मागे काहीही शिल्लक ठेवत नाही. सध्या फोटो वगैरे लोक ठेवतात. परंतु त्या फोटोला सुद्धा तीस पस्तीस वर्षाची मर्यादा आहे. त्यानंतर तो फोटो कुजून जातो. म्हणजे ज्या आई-वडिलांनी आजी-आजोबांनी भावा बहिणींनी तुमच्या कुटुंबाची वंशवेल चालवली,वाढवली त्यांना आपण परिपूर्ण इतिहास जमा करतो.कुठेही नोंद राहत नाही. कोण होते आपले आजी, आजोबा, पणजोबा याची कुठेच नोंद रहात नाही. म्हणजे आपण आपला इतिहास पुसून टाकतो. असा त्याचा अर्थ आहे.मित्रांनो मी तुम्हाला नम्र विनंती करतो आपल्या कुटुंबात आसपास शेजारी कोणी मयत झाल्यास त्यांच्या अस्थी आणि रक्षा ह्या हव्या तर दारात खड्डा खोदून एक फळझाड लावून त्या जतन करा. शेती असेल तर तिथे त्या हस्ती राखे वरती पिंपळाच किंवा फळाचे कोणतेही झाड लावा. शहरात असेल तर स्मशानभूमीच्या अवतीभवती तिथेही जागा नसेल तर शहराच्या भोवती जंगलाच्या आजूबाजूला झाड लावा कुंपण घाला आणि त्यांच्या नावाचा बोर्ड लावा. तुम्ही असेपर्यंत ते झाड तुमच्याशी रोज बोलेल. ते किमान 300 400 वर्ष त्या व्यक्तीची आठवण करत राहील. आणि साक्ष देत राहील. हे आपण सहज करू शकतो.आणि दूरवर गाड्या घोड्याचा खर्च करून जाणे तो खर्च टाळता येईल. आणि स्मृतीही जतन करता येतील. किती महत्त्वाचा विषय आहे पहा. वाचा आणि आपल्या परिसरातल्या सर्व मित्र नातेवाईक यांना कळवा. “एका मयत व्यक्तीच्या नावाने फक्त एक झाड लावल्यास किमान महाराष्ट्रात जेवढे लोक मृत्यू पावतात. तेवढी झाडे निर्माण होतील. मित्रांनो, निसर्गरक्षणा सोबत स्मृती जतन होतील”
भूमिपुत्र वाघ.
समाज सेवक
शिवधर्म प्रचारक महाराष्ट्र
9172972482.