मकरंद सावे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

लातूर : गेल्या आठवड्यापासून सातत्याने लातूर शहरात गेली कित्येक दिवस सततचा पाऊस अतिवृष्टी होत असल्या कारणाने लातूर शहरात अनेक भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लातूरकरांना ठिक ठिकाणी साचलेल्या कच-यांच्या ढिगापासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय आपणांस वारंवार तक्रार करून निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे जलवाहिन्यांतून प्रचंड प्रमाणात होणा-या पाणीगळतीमुळे दुषित पाणी पुरवठा होवून लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेने आता तरी त्वरीत यावर आपत्कालीन उपाययोजना करावी व आरोग्य, स्वच्छता यासारख्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी लातूर शहर मनपा आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे प्रशासकीय समिती नेमण्यात यावी व प्रभागनिहाय तक्रार नंबर उपलब्ध करावा जेणेकरून नागरिक आपल्या प्रभागासंबंधित समस्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तक्रारी सोडविण्यास मदत होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *