*अंतिम दर २६१५ रुपये
१५ कोटी ३५ लाख ७१ हजार १४२ रूपये खात्यावर जमा
लातूर : राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत मराठवाडा व विदर्भात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याकडून चालु हंगामात झालेल्या गाळप उस पुरवठा शेतकऱ्यांना उस बीलापोटी २१५ रूपये अंतिम हप्ता जाहिर केला असुन यापूर्वीच २४००/ रूपये मेट्रिक टन प्रमाणे पैसे अदा केले आहेत सोमवारी पुन्हा २१५ रूपये हप्ता खात्यावर जमा केला असून या बिलापोटी १५ कोटी ३५ लाख ७१ हजार १४२ रुपये खात्यावर अदा केले आहेत. जागृति शुगर साखर कारखान्याकडून अंतिम भाव २६१५ रुपये देण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.
तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजने यावर्षी चालू हंगामात ७ लाख १४ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले असून यापुर्वीच उस उत्पादक शेतकऱ्यांना २४००/ प्रमाणे मेट्रिक टन प्रमाणे अदा करण्यात आला होता आता २१५ रुपये मेट्रिक टन प्रमाणे अंतिम भाव २६१५/ रुपये मेट्रिक टन प्रमाणे आतापर्यंत रक्कम अदा करण्यात आली असून जागृती शुगरने गेल्या दहा वर्षात उस उत्पादक शेतकऱ्यांना आधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. २१५ रुपयाच्या अंतीम हप्त्याची रक्कम उस पुरवठा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधावा असे आवाहन जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले (देशमुख), उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सरव्यवस्थापक जी.जी.येवले संचालक मंडळ यांनी केले आहे.
अंतिम २१५ / रुपये हप्ता दिल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आनंदोत्सव साजरा
जागृती शुगर साखर कारखान्याकडून यापुर्वीच २४००/ रुपये प्रमाणे पैसे अदा करण्यात आले होते. आज सोमवारी अंतिम हप्ता २१५ रुपये दिल्याने कार्यक्षेत्रातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उदगीर, चाकुर तालुक्यांतील अशा ५ तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक गावात आनंदोत्सव साजरा करत ऐन पेरणी व शेतीच्या इतर कामात आर्थिक मदत मिळाल्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवीताई देशमुख भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करणारे ग्रामीण भागात डिजिटल बोर्ड झळकत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी, लातूर
9850347529