12 मोटारसायकलीसह 7,20,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर शहर डॅनियल बेन यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.

सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 03/07/2022 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2022 कलम 379 भादवी मधील मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावात, परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह अतिशय कमी किमतीत विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथक कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात माहिती मधील आरोपीच्या शोध घेतले असता मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे नेताजी नारायण घोडके, वय 39 वर्ष, राहणार- गुंडोपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड. यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने नमूद लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून सीमालगतच्या भागातील गावात कमी किमतीत मोटरसायकल विकल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने 12 मोटरसायकली जप्त केली आहेत.

तसेच सदर आरोपीस वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.नमूद आरोपीकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे करीत आहेत. उदगीर ग्रामीणच्या विशेष पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून 12 मोटार सायकलसह 7 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक तानाजी चेरले, सुमेध बनसोडे, तसेच पोलीस अमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड सचिन नाडागुडे यांनी पार पाडली.

लातूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
हारून मोमीन, एन टीव्ही न्युज मराठी
9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *