लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण आठ गुन्हे उघडकीस.
6 मोटरसायकलीसह 02 लाख 28 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत…
पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई
लातूर : याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 26/05/2022 रोजी लातूर येथील एक इसमास काही अनोळखी आरोपींनी पाळत ठेवून सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास भातखेडा शिवारात भातखेडा ते सोनवती जाणारे रोडवर फिर्यादी च्या कारचे समोर मोटर सायकल आडवी लावून कारवर दगड मारून काच फोडली व फिर्यादीला मारहाण करून फिर्यादी जवळील 15000/- हातातील एप्पल कंपनीची घड्याळ असा चाळीस हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेऊन मोटार सायकल वर बसून पळून गेले होते. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 117/ 2022 कलम 394,34 भादवि प्रमाणे अज्ञात अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ग्रामीण सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली होती. पथकातील पोलिस अंमलदारांना तपासाचे अनुषंगाने सूचना देऊन रवाना करण्यात आले होते.गुन्ह्यातील फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून व तपास पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे भिगवण लातूर अहमदपूर या ठिकाणी तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपी शुभम जाधव वय 21 वर्ष राहणार काळेगाव ता. अहमदपूर जि. लातूर आणि वैभव सांगुळे वय 19 वर्ष राहणार बँक कॉलनी अहमदपूर. अशा 02 आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून नमूद गुन्ह्यात बळजबरीने काढून घेतलेले रक्कम व घड्याळ जप्त करण्यात आले आहे. सदरच्या तपास पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात गुन्ह्याची उकल करून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल तपास केले असता सदरच्या आरोपी आरोपींनी लातूर व पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जबरीचोरी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यामध्ये
1)पोलीस ठाणे लातूर ग्रामीण,
गुन्हा रजिस्टर क्रमांक 117/ 2022 कलम 394 भा द वि
2)पोलीस ठाणे गांधी चौक
गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/ 2022 कलम 379 भादवी
3) पोलीस ठाणे अहमदपूर
गुन्हा रजिस्टर क्रमांक 304/2022 कलम 394, 341,34 भादवी
4) पोलीस ठाणे रेनापुर
क्रमांक 359/2021 कलम 379 भादवी
5)पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण
गुन्हा रजिस्टर क्रमांक 113/ 2022 कलम 379 भादवी
6) पोलीस ठाणे भिगवन जिल्हा पुणे
गुन्हा रजिस्टर क्रमांक 140/2022 कलम 392, 506, 34 भादवी
7) पोलीस ठाणे भिगवण जिल्हा पुणे
गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2022 कलम 379 भा द वि
8)पोलीस ठाणे येरवडा जिल्हा पुणे
गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2022 कलम 379 भादवी
प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्यात बळजबरीने चोरलेली रोख रक्कम व मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली व चोरलेली एकूण 6 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील हे करीत आहेत
सदरची कार्यवाही वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुरज गायकवाड, लातूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि प्रतिभा ठाकूर, पोलीस अमलदार सचिन चंद्रपाटले, मेहबूब तांबोळी, गंगाधर कलंगरे, बाबुराव येनकुरे, विनोद लखनगिरे, नितीन पाटील, चंद्रकांत उडते, उत्तम देवके, गजानन टारपे, जब्बार पठाण, संतोष थोरात सूर्यकांत शेंबाळे ,सदबाजी सुरनर, शैलेश सुडे, गणेश साठे , किशोर आळणे यांनी केली आहे.
प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529