(प्रविण बाबरे)
पालघर : कोरोना काळात आज सर्वच स्तरातील नागरिक घरात थांबलेले आहेत. त्यातील सर्वोच्च खालच्या बिंदूपर्यंत पोहचून त्यांना दिलासा, ताकद देणे सोबतच त्यांना खंबीरपणे उभे करणे हीच शिवसंपर्क अभियानाची भूमिका असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार हे अभियान सबंध पालघर जिल्ह्यात आपण राबवित आहोत असे मत शिवसेनेचे कुंदन संखे यांनी बोलताना व्यक्त केले. शिवसंपर्क अभियानांतर्गत सफाळे येथे दिव्यांगांना, मच्छिमार, भाजीविक्रेते यांना छत्र्या, वह्या तसेच रिक्षाचालकांना सेफ्टी गार्ड चे वितरण करीत असताना आयोजित केलेल्या कार्यक्रम ते बोलत होते.

शिवसेनेचे कुंदन संखे यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून पालघर जिह्यातील विविध ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहाकरिता व्यवसाय करण्याऱ्या महिलांना एक मदत म्हणून ते छत्री वाटपाचा उपक्रम राबवित आहेत. त्यांनी आजपर्यंत सर्व समाज घटकातील व्यक्तींना हजारो छत्र्याचे वाटप केले असून त्यांच्या या उपक्रमाने कोरोना काळात मेहनत करून आपलं घर चालविण्याऱ्या कुटुंबांना एक प्रकारे मदतच होत आहे.
त्याच अनुषंगाने पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेत विविध गावातून येऊन मच्छी तसेच भाजीपाला विकण्याऱ्या शेकडो महिलांना छत्रीचे वाटप केले. या सोबतच त्यांनी येथील वंदे मातरम अंध-अपंग संस्थेला भेट देऊन तेथील दिव्यांगांना वह्या व छत्रीचे वाटप केले. तर शिवसेनेचे बोईसर विधानसभा समन्वयक अनुप पाटील यांनी आपल्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना मदत म्हणून 15 हजार रुपये देण्याचे जाहीर केले.

त्याचप्रमाणे सफाळे येथील पूर्व-पश्चिम भागात सार्वजनिक सेवा देण्याऱ्या रिक्षांच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती ह्वावी, प्रवासी व रिक्षा चालक यांच्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये तसेच तसेच रिक्षाच्या माध्यमातून रोजच्या रोज प्रवास करण्याऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचावी म्हणून शिवसंपर्क अभियानांतर्गत शेकडो रिक्षाचालकांना कोरोना प्रतिबंधक सेफ्टी शिल्ड चे यावेळी वाटप सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे, शिवसेनेचे डॉ. विश्वास वळवी, शिवसेनेचे बोईसर विधानसभा समन्वयक अनुप पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सफाळे विभाग प्रमुख संतोष घरत, अजित गावड, हरिश्चंद्र गावड, अरुण पाटील, विकास पाटील, नरेश पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटात शिवसेनेने विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आपली जवाबदारी प्रामाणिक पणे पार पाडली असून याहीपुढे सातत्यपूर्ण सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात शिवसेनेचे कार्य पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.
– कुंदन संखे, शिवसेना पालघर.