section and everything up until
* * @package Newsup */?> पालघर : जव्हार तालुक्याला अतिवृष्टीचा फटका,आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटल्याने आदिवासी बांधवांचे हाल | Ntv News Marathi

(पालघर जिल्हा)

पिंपळशेत खरोंडा पाड्यांत दळणवळणा अभावी ५ किलोमीटर पायपीट.

पालघर : जिल्ह्यातील निसर्गरम्य वनसृष्टीने नटलेल्या जव्हार तालुक्याला गेल्या दोन तीन दिवसांपासुन पडणाऱ्या  मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हार  ओळखले जाते.समुद्र सपाटी पासून १६०० फूट उंच जव्हार आहे.ह्या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे,परंतु उतार असल्यामुळे पाणी साचून राहत नव्हते.पण यंदा जव्हारला हि पूर स्थितीचा अनुभव पाहायला मिळाला आहे.पाणी वाहून जाणाऱ्या ठिकाणावर,गटारांवर जव्हार नगरपरिषदेच्या हद्दीत मातीचा भराव टाकुन झालेली अतिक्रमणे पुराला कारणीभूत ठरली आहेत.यंदा यावर्षी पावसाने कहर केल्याने जांभुळविहिर परिसरात काहींच्या घरात पाणी शिरले,ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले,भुस्खलन झाले  दरडी कोसळल्या तर चोथ्याची वाडी धानोशी रस्त्याची मोरी वाहुन गेल्याने तेथिल रामखिंड,डोंगरपाडा,पाथर्डी,कडाची मेट,खिडसा या गाव" शहरी भागाशी असलेला संपर्क  तुटला आहे.यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

     जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेले पिंपळशेत खरोंडा हद्दीतील माडविहरा,हुंबरण या गावांचा हि संपर्क तुटला आहे.झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने माडविहरा गावातील रस्त्याची मोरी वाहुन गेली आहे.त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचे मोठे हाल झाले आहेत.तरी सुध्दा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापनाचे  अधिकारी नुकसानीचे पंचनामे करायला अद्याप हि फिरकले नाहीत.हे दुर्दैव आहे.
   तसेच, शिंगारपाडा ते ओझर रस्त्यावरील मोरी तुटल्या आहेत. त्यामुळे ह्या गावात येणारी ओझर बस सेवा  बंद आहे. त्यामुळे ओझर,शिंगारपाडा,माडविहरा हेदीचापाडा येथील नागरिकांना दळवळणा अभावी जव्हारला जाण्यासाठी पाच किलोमीटर दूर पायपीट करत पिंपळशेत येथे जाऊन प्रवास करावा लागण्याची वेळ आदिवासी बांधवांवर ओढवली आहे.रस्त्याची मोरी तुटल्या कारणाने परिवहन मंडळाची जव्हार डेपोची बस ओझरला न जाता हेदीचापाड्यालाच फिरून जाते व वस्तीची मुक्कामी गाडी मेढा मार्गाने ओझरला येते.त्यामुळे रात्रीच्या वेळी ८ ते ९ वाजता माडविहरा, शनिवारवाडा, हेदीचापाडा अशा ५ किलोमीटर रात्रीची पायपीठ करत प्रवासांना पायी घर गाठावे लागत आहे. दळवळणाच्या सुखसोयी अभावी आदिवासी बांधवांना हाल सोसावे लागत आहेत.पिंपळशेत खरोंडा या गावांना वाडा डेपोची येणारी बस सुध्दा रस्त्या अभावी गावांपर्यंत न जाता आखरा गावापर्यंतच जाते.त्यामुळे ग्रामीण भाग असलेल्या पिंपळशेत खरोंडा गावाचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परंतु जव्हार तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी,आमदार यांच्या दुर्लक्षामुळे हा भाग आजही वंचित राहिलेला आहे.
  "माडविहरा गावाजवळील मोरी पाण्याने वाहुन गेल्याने माडविहरा ,हुंबरण गावांचा संपर्क तुटला आहे.येथील दळवळण,बससेवेचा प्रश्न सोडवावा.अशी ग्रामस्थांची मागणी आहे."

जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860/9404346064.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *