- अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम..!
- परिवहन वाहतूक मार्गदर्शन सदस्य म्हणून विशेष जबाबदारी..!

अहिल्यानगर प्रतिनिधी | दि. १८ फेब्रुवारी २०२६
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री. अविनाश देडगांवकर यांची लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती’वर परिवहन वाहतूक मार्गदर्शन सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
निस्वार्थ समाजसेवेची दखल
अविनाश देडगांवकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये निस्वार्थ भावनेने उल्लेखनीय समाजसेवा करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल मिशन कंपाऊंड कापडबाजार, अहिल्यानगर येथील ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाने घेतली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि महाविद्यालयातील भौतिक सुविधांच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्व
अविनाश देडगांवकर हे केवळ समाजसेवकच नव्हे, तर विविध पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व आहेत. त्यांना मिळालेल्या काही प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत.
- समाजभूषण पुरस्कार
- कोरोना योद्धा पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
- महात्मा जोतिबा फुले पुरस्कार
- समाजरत्न पुरस्कार
निवड पत्राचे वितरण
निवड पत्राचे वितरणविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. छाया काकडे यांनी अविनाश देडगांवकर यांना अधिकृत निवड पत्र प्रदान केले. या निवडीबद्दल देडगांवकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
वृत्त संकलन: विशेष प्रतिनिधी, अहिल्यानगर.
