पोलीस दलात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी
लातूर : पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची नुकतीच स्थापना केली आहे. याद्वारे बेकायदेशीरपणे महिला तरुणींना चुकीचे काम करायला लावणाऱ्यावर कारवाई करून त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. या कक्षाच्या पथकाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात कक्षाचे प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या टीमने सायबर सेलच्या मदतीने, लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अपहरणच्या 13 गुन्ह्यांची उकल करून राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करून एकूण 13 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच अनैतिक व्यवसायाशी संबंधित 6 तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. अनेकदा इतर राज्यातून, दुसऱ्या देशातून तरुण मुलींना पळवून आणले जाते व त्यांना शरीरविक्रीयाच्या धंद्यात ढकलले जाते. तर अनेकदा तरुण मुलींचे अपहरण करून त्यांना इतर भागात पाठविले जाते. चुकीचे पासपोर्ट, कागदपत्र बनवून स्त्रिया किंवा पुरुषांना बेकायदेशीर रित्या कामाला लावणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी लातूर पोलिसांनी “अँटी ह्यूमन ट्राफिकिंग कक्ष” स्थापन केला आहे.
सदरच्या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी महिला पोलीस अंमलदार वंगे, लता गिरी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार हे कार्यरत आहेत.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529