section and everything up until
* * @package Newsup */?> जळकोट तहसीलवर कॉंग्रेसचा मोर्चा | Ntv News Marathi

▶️ तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार


▶️हातात वाळलेल्या सोयाबीन पेंढया

जळकोट तालुक्यात एक ते दीड वर्षांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.त्यामुळे शेतक-यांना पाणी उपलब्ध असुन ही पिकांना पाणी देता येत नाही.ग्रामपंचायती मार्फत नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाही.यासह अन्य विविध मागण्यासाठी निवेदन देऊन ही कार्यवाही होत नसल्याने जळकोट कॉंग्रेस तालुक्याच्यावतीने तालुका अध्यक्ष मारुती पांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जळकोट तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना योग्य प्रमाणात नियमाप्रमाणे विज उपलब्ध करून देण्यात यावे.जळकोट येथे महावितरण उपविभागीय कार्यालय मंजूर करावे.पाण्याअभावी वाळून गेलेल्या सोयाबीन व इतर पिकांची नुकसान भरपाई द्यावी,१०० टक्के पिकविमा तत्काळ लागु करावा, शेतक-यांना रब्बीच्या पेरण्यासाठी अर्थसाहाय्य करावे, शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा.शेतक-यांना म.ग्रा.रो.ह.यो.चे.कामे उपलब्ध करून देण्यात यावे.कोळनुर, जळकोट,व वांजरवाडा येथील ३३ के.व्ही.फिडरची क्षमता वाढवून विजपुरवठा सुरळीत करावा, जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असल़ेले तालुक्यातील सर्व गावातील विजे संदर्भातील सर्व कामे कंत्राटदाराकडून विहीत वेळेतच पुर्ण करुन घ्यावे व काम करण्यास विलंब व दिरंगाई करणा-या कंत्राटदारांवर नियमानुसार कडक कारवाई करावी.या मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार जी.एल.खरात यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी शेतक-यांनी तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वाळलेले सोयाबीन हातात घेऊन आंदोलन केले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मारुती पांडे, कॉंग्रेस जेष्ठ नेते बाबुराव जाधव,शहर अध्यक्ष महेश धुळशेट्टे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सरपंच मेहताब बेग,माजी सभापती बालाजी ताकबिडे, अल्पसंख्याक अध्यक्ष शुर पठाण, शिरीष चव्हाण, बाबुराव पाटील, विश्वनाथ इंद्राळे, मागासवर्गीय ता.अध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
मो.नं.९१३०५५३९९७,९०२२४९३४९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *